क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

जातीवरून अपमान करून महिलेला शारीरिक व मानसिक त्रास

चाकण (वास्तव संघर्ष) : जातीवरून अपमान करून एका महिलेला घरातून बाहेर काढून टाकले आहे. तसेच वारंवार शारिरिक व मानसिक त्रास देण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 20) रोजी आर.पी.एस टाऊनशिप चाकण येथे घडली आहे. याप्रकरणी पती आणि सासूवर ॲस्टोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिडीत 28 वर्षीय विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पती-सुमित पाटील (वय-31 ) सासू वय-60 (सर्व रा. आर.पी.एस टाऊनशिप चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 ते 2022 दरम्यान आरोपींनी पती आणि सासूने फिर्यादी महिलेला वारंवार महिलेचा जातीवरून अपमान करत मानसिक व शारिरीक विवाहितेला राहत्या घरातून हाकलून दिले. याबाबत फिर्यादी महिलेलेने चाकण पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज दिला होता त्यावरुन पती आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Share this: