तरुणीला फसवण्यासाठी त्याने केले दोन वेळा लग्न
आळंदी(वास्तव संघर्ष): लग्न जमवण्याचा नादात तरुणीला मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची घटना समोर आली आहे. संगम डॉट कॉम या मेट्रोमनी साईटवरून मैत्री केलेल्या मित्राने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत दोन वेळा खोटे लग्न करुन बलात्कार केला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2021 ते मार्च 2022 या कालावधीत आळंदी, कात्रज, स्वारगेट, शिरवळ या ठिकाणी घडला आहे.
पिडीत तरुणीने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गौरव प्रवीण चव्हाण (वय 25,रा. खोडवली, ता. जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव याने पिडीत फिर्यादी तरुणीसोबत संगम डॉट कॉम या मेट्रोमनी साईटवरून ओळख केली. फिर्यादी तरुणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवले. तूच मला आवडली आहे. मी तुला आयुष्यभर सुखात ठेवीन. माझी तुला सांभाळण्याची पूर्ण तयारी आहे’ असे आरोपीने तरुणीला आश्वासन दिले. तरुणीला मंगळसूत्र घालून तिच्यासोबत दोन वेळा खोटे लग्न केले.त्यानंतर फिर्यादी तरुणीला कात्रज, स्वारगेट, शिरवळ या ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध करून विश्वासघात व फसवणूक केली. अधिक तपास आळंदी पोलीस करीत आहेत.