बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

गरिबांची लूट करणा-या अतिक्रमण अधिका-यांवर आयुक्तांचा जोरदार दणका

पिंपरी (वास्तव संघर्ष) : एकिकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने गोरगरिबांच्या हातगाडी टपरी चालकांवर अतिक्रमण अधिकारी कुणाचीही भिडभाड न ठेवता बिनधास्त कार्यवाही करताना दिसतात त्यातच आता हेच अधिकारी अतिक्रमण केलेल्या गोरगरिबांकडून अव्वाच्या सव्वा रूपये गोळा करत आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दंडात्मक कारवाई केली जात आहे.

कारवाईनंतर देण्यात येणाऱ्या पावती मध्ये महापालिका कर्मचारी फेरफार करून महानगरपालिकेची फसवणूक करत असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांच्या निदर्शनास आले आहे. पावती देताना एक रक्कम दाखवली जात आहे तर ओसी वर दुसरी रक्कम दाखवून सर्वसामान्य लोकांची लूट करण्यात येत असले बाबत तक्रार प्राप्त होत आहेत.त्यानुसार आयुक्तांनी प्रियांका शिंदे व दिपाली जगदाळे या दोन पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असे आदेश दिलेले आहेत.

सामान्य पावती पुस्तकावरील नोंदी मधील तफावत असले बाबतच्या प्रियांका शिंदे व दिपाली जगदाळे यांनी सादर केलेल्या खुलाशावर यांचा खुलासा संयुक्तिक वाटत नाही असा अभिप्राय क्षेत्रीय अधिकारी यांनी दिलेला आहे.सदर प्रकरणी माननीय आयुक्त तथा प्रशासक यांनी उपरोक्त प्रियांका शिंदे व दिपाली जगदाळे यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असे आदेश दिलेले आहेत.

Share this: