बातम्यामहाराष्ट्र

संतापजनक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावला म्हणून तरुणाला पोलिसांनी केली शिवीगाळ

पुणे (वास्तव संघर्ष) :पुण्यातील हडपसर येथील पोलीस ठाण्यात अत्यंत घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले बक्कल खिशावर लावला म्हणून एका पोलीस अधिकाऱ्याने तरूणाला शिविगाळ करीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरले आहे.

हडपसर पोलिस स्टेशनचे क्राईम पोलीस निरीक्षक राजू अडागळे असे त्या पोलिसाचे नाव आहे.

याबाबत यशवंत अरुण बनसोडे यांनी सदरील जातीवादी पोलिसावर कारवाई करण्याची मागणी केली आहे, 11 मार्च 2021 रोजी हडपसर पोलीस स्टेशन अंकीत फुरसुंगी पोलीस चौकीच्या हद्दीत सदरील घटना घडली असून राजू अडागळे यांच्याविरोधात अद्याप वरीष्ठाकडून कसलीही कारवाई करण्यात आली नाही. जातीवादी अडागळे यांच्यावर कारवाई करावी याबाबत दिनांक 23 मार्च 2021 लोकनायक संपादक व पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निषेध धरणे आंदोलन करण्यात आले होते. तरीही जातीवादी अढागळे याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

सविस्तर वृत्त असे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न घातलेल्या व्यक्तिवर पोलिस पुण्यात दंडात्मक कारवाई करीत होते. मास्क न घातलेल्या आपल्या सहकारी मनीषा कांबळे आणि रोहन गायकवाड यांची दंडाची पावती करण्यास यशवंत बनसोडे हे हडपसर पोलिस स्टेशनमधे गेले असता, हडपसर पोलिस स्टेशनचे क्राईम पोलीस निरीक्षक राजू आढागळे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी ‘बाबासाहेब फिबासाहेब’ असा एकेरी उच्चार करून बाबासाहेब छातीला लावून आमच्या समोर येऊ नकोस आणि पहिला तो बाबासाहेबांचा फोटो छातीवरून काढ नाहीतर तुला कुत्र्यासारखा मारेन असे म्हणून पोलीस अधिकारी आढागळे यांनी यशवंत बनसोडे यांना शिवीगाळ करून अंगावर मारण्यासाठी जात होते व त्यांच्या दुचाकीची चावी सुद्धा काढून घेतली.

आणि आपल्या सहकारी कर्मचाऱ्यास सांगितले की याची स्टेशन डायरी कर तुझ्या नावाने कर नाहीतर माझ्या नावाने कर पण याची स्टेशन डायरी कर. असे म्हणत पोलीस निरीक्षक राजू आडगळे यांनी बनसोडे यांना दबावाखाली घेण्याचा प्रयत्न केला.दरम्यान काही दिवसावर येऊन ठेपलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आधीच अशा मस्तवाल आणि जातीयवादी पोलीस अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी समाजबांधवांनी व्यक्त केली आहे.

Share this: