गांजा ओढणा-या दोघांना पोलिसांनी केली अटक
सांगवी (वास्तव संघर्ष) : सांगवीतील पवना नदीकडेला महादेव मंदीरासमोर गांजा ओढत बसलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.29) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पोलीस नाईक दादा धस यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रमेश बाळु रोकडे ( वय 26, रा. पिंपळे गुरव ) आणि संदीप ज्ञानेश्वर नरबेकर ( वय 37,रा. दापोडी ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जुनी सांगवी येथील पुलाखाली पवना नदीकडेला महादेव मंदीरासमोर गांजा ओढत बसले होते. आरोपी चिनी मातीच्या चिलीम मध्ये गांजा भरुन ओढत असताना आढळून आले.अंमली पदार्थ विरोधीपथकाने तात्काळ त्यांना अटक केली आहे. आरोपीकडून गांजा ओढण्याचे साहित्य जमा केले असून अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत.