बातम्या

मिञांनीच केला मिञाचा खून ; दिड वर्षानंतर लागला हत्येचा छडा

पिंपरी (वास्तव संघर्ष) : चिंचवड पोलीस स्टेशनच्या हददीत दिड वर्षापुर्वी एका तरुणाचा  गळा कापलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. तब्बल दिड वर्षानंतर या खुनाचा उलगडा करून याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

राकेश कुमार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे

मुख्य आरोपी रत्नेशकुमार रमाकांत रॉय, सुबोध अखिदर प्रसाद कुशवाह(  रा. मधुआहा बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत राकेश हे दलने इंडस्ट्रीज प्रा.लि. सेक्टर पुणे या कंपनीत एकञ कामाला होते. किरकोळ कारणावरून त्यांचेमध्ये वाद निर्माण झाला होता. हा राग मनात धरून आरोपी रत्नेशकुमार व आरोपी सुबोध याने संगणमत करुन राकेश कुमार यांचा गळा कापून खून केला. पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी तपास पथके बंगलोर व कर्नाटक येथे रवाना केलेली त्यानंतर बिहार या ठिकाणी थांबुन गुप्त बातमीदारामार्फत तर कधी वेशांतर करून तसेच  स्थानिक पोलीसाची मदत घेऊन त्यांनी आरोपी अटक केली.

सदरची कारवाई पिंपरी चिवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे  अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) डॉ . काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ . प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली t गुन्हे शाखा युनिट-1  वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर , सहायक पोलीस निरीक्षक कैलास पोलीस उपनिरीक्षक मांगे , पोलीस अमलदार फारूख मुल्ला , सोमनाथ बो – हाडे , महादेव जावळे , अमित खानविलकर , सचिन गोरे गनोजकुमार कमले , गणेश महाडीक बाजू कोकाटे , प्रमोद गजे , मारुती जायभाय , प्रमोद हिरळकर यांचे पथकाने केली आहे . तात्रीक विश्लेषण  तात्रीक शाखेचे पोलीस हवालदार माळी यानी करून तपास पथकास विषेश सहकार्य केलेले आहे .

Share this: