आनंद उनवणे यांच्या पत्नी आणि भावावर गुन्हा दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवडमधील प्रसिद्ध व्यवसायिक मयत आनंद उनवणे यांच्या पत्नी आणि भावासह दोघांवर मारहाण केल्याचा पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.29) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास रसरंग चौक अजमेरा पिंपरी येथे घडला आहे.
याबाबत सरस्वती संदेश सोनवणे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार मुक्ता आंनद उनवणे (वय-37, रा. मोरवाडी पिंपरी), जया (वय-36 ), विष्णू साहेबराव उनवणे (वय-42,रा. चिखली), मनिषा पवार (वय-35,रा. मोरवाडी पिंपरी) या आरोपी विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ऑफीसच्या शॉपचे भाडे मागण्याच्या कारणावरुन जबदस्तीने शॉपमध्ये प्रवेश केला तसेच यातील आरोपी जया हिने फिर्यादी सरस्वती यांचे दोन्ही हात पकडुन ठेवत आरोपी मुक्ता हिने फिर्यादी सरस्वतीचे केस पकडून हाताने मारहाण करत फिर्यादीच्या उजव्या हाताच्या करंगळीला व उजव्या बगले जवळ चावा घेत ऑफीसमधील खुर्ची बाहेर फेकून देवून तोडून नुकसान केले. तसेच आरोपी मनिषा हीने ऑफिसमध्ये घुसुन शिवीगाळ केली तसेच आरोपी विष्णू याने फिर्यादीला अश्लिल शिवगाळ केली त्यानंतर आरोपी मुक्ता हीने फिर्यादीस मारहाण करण्यासाठी चिथावणी देत लोखंडी हतोडी घेवुन फिर्यादीचे अंगावर धावुन आली. तसेच फिर्यादीचे मुलाला शिवीगाळ दमदाटी करुन त्याचे डावे हातावर लोखंडी हतोडीने मारहाण करुन त्यास जखमी केले. याबाबत अधिक तपास पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे करित आहेत.