बातम्या

वाढत्या महागाईविरोधात ‘बीआरएसपी’चे आंदोलन

पिंपरी (वास्तव संघर्ष) : वाढती महागाई आणि बेरोजगारीने होरपळून निघत असलेल्या जनतेचा उद्रेक तसेच घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेलच्या अशा इतर महागाईविरोधात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने पिंपरीतील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात शुक्रवारीआंदोलन करण्यात आले. राज्य, केंद्र सरकारच्या विरोधात जाहीर निदर्शने केली.

यावेळी पुणे ग्रामीण अध्यक्ष किरण साळवे, जिल्हाध्यक्ष धीरज बगाडे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष बाळासाहेब भालेराव, महिला आघाडीच्या रचना जाधव, पंकज धेडे आदी सहभागी झाले होते.

आकाशाला भीडलेल्या पेट्रोल,डिझेल,घरगुती गॅस, सीएनजी, एलपीजी यांच्या किमती यामुळे प्रचंड वाढलेल्या महागाई मुळे राज्यातील नागरिक त्रस्त आहे. केंद्र सरकार राज्य सरकार मधील मंत्री आमदार खासदार मस्त आहेत. स्वतःलाच अनेक सवलती वाटून घेण्यामध्ये दंग आहेत. केंद्र राज्य सरकारने जनतेवर लादलेले अनेक जुलमी टॅक्स कमी करण्याची गरज असताना राज्य – केंद्र सरकारे निवडणुका सरकारी दौरे आमदार खासदारांच्या पेन्शन त्यांना बिनव्याजी कर्ज व्यवस्था अशा अनेक सोयी सवलतींचा वर्षाव करत आहेत. ही राज्य व केंद्र सरकारसाठी शरमेची बाब आहे आणि त्यामुळेच पक्षातर्फे केंद्र व राज्य सरकारच्या अशा जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आल्याचे किरण साळवे यांनी सांगितले .

Share this: