गळफास घेऊन विवाहीत महिलेची आत्महत्या
चिखली (वास्तव संघर्ष) : गाडी आणि फ्रिज घेण्याकरीता माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहीतेचा शारिरीक आणि मानसिक छळ केला.याला कंटाळून विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.ही घटना रविवारी (दि. 01)रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली. विवाहीतेला हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूजा गणेश हाके ( वय 22 ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
पती गणेश पांडुरंग हाके ( वय- 28 ), सासू, नणंद, चूलत सासरा शिवाजी केरबा हाके ( वय- 41) मावस दिर ओमकार गोविंद देवकाते ( वय 25 ) मावस सासरा पांडुरंग विश्वनाथ देवकाते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मृत पूजा सासरी नांदत असताना आरोपींनी तिच्याकडे गाडी , फ्रीज घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली . त्यावरून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला . या त्रासाला कंटाळून पूजाने शुक्रवारी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत .