बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिक मुलभूत सुविधेपासून वंचित ; ॲड : सोनाली घाडगे

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडच्या दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिक मुलभूत सुविधेपासून वंचित असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल पिंपरी शहर यांच्या वतीने शुक्रवारी ( दि. 10 जुन) रोजी पुणे जिल्हा नोंदणी उपमहानिरीक्षक कराड आणि सोनवणे यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये वकील महिलांना, वकील पुरुषांना, अंध-अपंग, नागरिकांना प्राथमिक व मुलभुत सोई सुविधा पुरविण्यात याव्या तसेच येथील एजंटगिरी ला आळा लवकरात लवकर बसवून नागरिकांची होणार आर्थिक लूट थांबवावी.

या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये खरेदी विक्रीची तसेच इतर दस्ताच्या नोंदणी कामी अमाप अशी गर्दी जमा असते. ज्यामध्ये दस्त नोंदनी कामी उपस्थिती असणाऱ्या नागरिकांना, वृद्ध, अपंग तसेच महिलांना , तसेच वकील महिला वकील पुरुषांना तासन तास त्या ठिकाणी येऊन बसावे लागते. अश्या लोकांच्या सोईकडे लक्ष न देता अनेक नागरिकांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी महिलांकरिता वा अपंगाकरिता स्वच्छतालय ही नाही.

तसेच वकील महिलांना पुरुषांच्या रांगेत उभे राहावे लागते ज्यामुळे अनेक वेळा महिलांना धक्का बुक्की होण्याचा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे महिलांना प्राधान्य देऊन त्यांची स्वतंत्र वेगळी रांग असावी त्यासाठी वेगळ्या टोकनची व्यवस्था करण्यात यावी.वकील हे ज्युडिशीयल ऑफिसर आहेत त्यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे . तसेच पावसाळा सुरू होत असुन पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीतील दुय्यम निबंधक येथे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे तरी सर्व नागरिकांच्या सोई सुविधा लवकरात लवकर उपलब्ध कराव्यात म्हणजे नागरिकांना पावसात भिजण्याची वेळ येणार नाही असे देखील निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा ॲड सोनाली घाडगे, ॲड कांचन गर्जे राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल पुणे शहर खडकवासला विधानसभा अध्यक्ष, ॲड आरती परकले लीगल सेल सचिव यांनी सदर मागण्या या राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल प्रदेश अध्यक्ष आशिष दादा देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष ॲड सुहास पडवळ , प्रदेश चिटणीस ॲड विवेक भरगुडे सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कवीता आल्हाट या सर्वांच्या मार्गदर्शनाने सदर मागण्या करण्यात आल्या आहेत.

Share this: