क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

गणपती मिरवणूकीत गेले आणि लाखो रुपये गमावून बसले

गणपती मिरवणूकीत गेले आणि लाखो रुपये गमावून बसलेपिंपरी (वास्तव संघर्ष):गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये भाविक तल्लीन असताना चोरांचे चांगलेच फावत असते.विसर्जन मिरवणुकीत चोरीच्या तक्रारी होत असतात यामध्ये मोबाइल, दागिने आणि पाकीट चोरीचा समावेश आहे. मात्र ; चोरांनी चोरी करण्यासाठी बंद घरे हेरून चोरी करण्याचा सपाटा लावला आहे. गणपती मिरवणूकीत गेलेल्या एका घरांचे कुलुप तोडून चोरांनी लाखो रुपये चोरले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.9) रोजी दिडच्या दरम्यान साई चौक सार्वजनिक शौचालयासमोर पिंपरी येथे घडली आहे.

अजय मख्खनलाल बजाज यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी अजय आणि त्यांच्या घरातील सर्व जण घराच्या दरवाजाला कुलुप लावुन गणपती मिरवणुकी मध्ये जावुन नंतर परत घरी आले असता फिर्यादी अजय यांच्या घराच्या दरवाजाचे कुलुप तुटलेले दिसले व घरातील कपाटातील सामान जमिनीवर विस्कटलेले दिसले व कपाटाचे पत्र्याचे पेटीत ठेवलेले तेरा लाख पस्तीस हजार रुपये कीमतीचे 45 ग्रॅम सोने व पन्नास हजार रुपये रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेले आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करित आहेत.

Share this: