बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

शहरातील सोसायटी धारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध – अजित पवार

पिंपरी(वास्तव संघर्ष) : भारतीय जनता पक्षाची महापालिकेत पाच वर्षे सत्ता होती. मात्र, या सत्ता काळात भाजपने शहरातील सोसायटी धारकांचे प्रश्न सोडविले नाहीत. त्यामुळे सोसायटी धारकांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटीबद्ध असल्याची ग्वाही राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (बुधवार) दिली.

शहरातील सोसायटीधारकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते पवार सोसायटीधारकांशी थेरगाव येथे सोसायटीधारकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी पवार बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहल, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, माजी नगरसेवक राहुल भोसले, मयूर कलाटे, श्याम लांडे, विनोद नढे, नाना काटे, शहर प्रवक्ते विनायक रणसुभे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेविका माया बारणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, सतीश दरेकर, संजय वाबळे, राजेंद्र साळुंखे, राजेंद्र जगताप, स्वाती काटे, कैलास बारणे, वर्षा जगताप, अतुल शितोळे, दीपक साकोरे, प्रकाश सोमवंशी आदी उपस्थित होते.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक माजी नगरसेविका माया बारणे यांनी केले.अजित पवार म्हणाले, शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न केले आहे. भामा-आसखेड धरणाचे पाणी शहराला मिळणार आहे. शहराला 24 तास पाणी कसे मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वाद मिटतील का? असे विचारले असता पवार म्हणाले, दोघांतील वाद पराकोटीला गेले आहेत. त्यात पुढाकार कोणी घ्यायचा हा प्रश्न असून शब्दाने शब्द वाढत जातो. जसे दिवस पुढे जातील तशी कटुता कमी होईल. जनतेसमोर जातील. आता मुंबईतील पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष राहील. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणूक निकालावर लक्ष असेल. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार की गोठवणार का? गोठवले तर दोघे दुसरे कोणते चिन्ह घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेतील या घडामोडींमुळे महाराष्ट्र अस्थिर होणार नसल्याचे पवार म्हणाले.

Share this: