क्राईम बातम्याबातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

रिल्स बनवण्याच्या नादात तरूण बनला गुन्हेगार

पुणे (वास्तव संघर्ष):सोशल मिडीयावर रिल्सच्या नादात एक तरुण गुन्हेगार बनल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी घडली असून रिल्स स्टार च्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

संजय बोऱ्हाडे (रा.रांजणगाव गणपती मंदिर पुणे) असे अटक करण्यात आलेल्या रिल्स स्टारचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, आरोपी संजय बोऱ्हाडे हा सोशल मिडीयावर रिल्स व्हिडिओ बनवत असायचा. त्याला रिल्स, टिकटॉक व्हिडीओ बनवण्याचा छंद आहे. सोशल मीडियावर 50 हजार पेक्षा जास्त त्याचे फॉलोअर्स आहेत.फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी त्याला चांगल्या दर्जाच्या मोबाईलची गरज होती.त्याच्याकडे नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते.त्यामुळे तो टेन्शनमध्ये होता. मात्र नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी त्याने चुकीचा मार्ग निवडला.रांजणगाव येथील एका व्यक्तीच्या राहत्या घरातून त्याने मोबाईल चोरी केला. चोरीप्रकरणी संजयवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.अधिक तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Share this: