धक्कादायक: पिंपरी चिंचवडमधील पञकाराने केला प्रेयसीचा खून
पिंपरी (वास्तव संघर्ष):पिंपरी चिंचवडमधील बोगस आणि तोतया पञकार हा नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. मात्र आता काही पञकार हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे कृत्य करत करत अट्टल ग्रुन्हेगार बनताना दिसत आहे. यातच आता पिंपरी चिंचवडमधील एका युटुब न्यूज पोर्टलच्या पञकाराने प्रेयसीच्या ब्लॅकमेंलीगला कटांळून तीची विल्हेवाट केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.ही घटना 3 ऑगस्ट 2022 रोजी घडली असून याप्रकरणी 5 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस नाईक लक्ष्मण डामसे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रामदास पोपट तांबे ( वय 30,रा.भोसरी ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे आरोपीचे नाव आहे.
चंद्रमा सीमांचल मुनी ( वय 28 , रा.ओरिसा ) असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बेपत्ता चंद्रमा हिने तिच्या वडिलांच्या नावावर असलेल्या दोन घरांपैकी एक घर तिच्या नावावर करून द्यावे तसेच पैसे आणि दागिनेही द्यावे अशी मागणी केली होती.त्यासाठी तिने आरोपी रामदास तांबे याच्या नावाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. आरोपीला ते पटत नसल्याने त्यांच्यात वाद वाढले.जर आरोपीने तिला साथ दिली नाहीतर ती त्याला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवणार अशी धमकी तिने दिली. तिच्यापासून कायमची सुटका करून घेण्यासाठी आरोपी रामदास तांबे याने तरुणीला जीवे मारण्याच्या उद्देशाने भोसरीमधून केळगाव येथे नेले.तिथे नदी पात्रात तिची विल्हेवाट लावली. अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत .