‘ तेरी मौत का बदला हम जरूर लेंगे…व्हॉटसअप स्टेट्स ठेवून दहशत
पिंपरी (वास्तव संघर्ष): तेरी मौत का बदला हम जरूर लेंगे… असे व्हॉटसअप स्टेट्स ठेवून प्रतिस्पर्धीच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीविरोधात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार 26 ऑक्टोबर पासून 3 नोव्हेंबर या कालावधीत घडला .
पोलीस शिपाई मोहसिन शेख यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यानुसार आतीश काळे ( वय -25 रा.मोरवाडी बौद्ध विहाराजवळ पिंपरी ) व अर्जून भिमराव वंजारी ( वय- 24,रा.जिजामाता हौसिंग सोसायटी चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहेआहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपीने त्याच्या मोबाईलवरून त्यांचा मित्र व सराईत गुन्हेगार पवन विष्णू लष्करे याच्या खूनाचा बदला घेण्याच्या आशयाने लष्करे याचा फोटो स्टेटसवर ठेऊन त्याला “ए दोस्त अपनी दोस्ती की मिसाल एक ना एक दिन जरुर देंगे,चाहे कितने भी दिन गुजर जाए , तेरी मौत का बदला हम जरूर लेंगे ‘अशा आवाजाचा व्हिडीओ बनवून व्हायरल केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .मयत पवन विष्णू हा पिंपरी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आरोपी हे त्यांच्या टोळीचे सदस्य आहेत.अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.