बातम्या

जखमी कबड्डीपटू राधा मोरेंना दत्ता काका साने फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात

चिखली (वास्तव संघर्ष) :कब्बडी खेळताना जखमी झालेल्या राष्ट्रीय कनिष्ठ कबड्डीपटू राधा मोरे हिला दत्ता काका साने स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश दत्ता साने यांच्या वतीने 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे .

कुमारी राधा विलास मोरे असे मदत केलेल्या कबड्डीपटूचे नाव आहे.

या वेळी तिला भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या . राधा मोरे हिने खेलो इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता . तिचे वडील आरोग्य विभागात सफाई कर्मचारी आहेत . कबड्डी खेळताना जखमी झाल्यामुळे तिला तातडीच्या उपचाराची गरज होती . परंतु आर्थिक परिस्थतीमुळे उपचार करण्यात अडचण येत असल्याने फाउंडेशनचे यश साने यांच्या वतीने ही मदत करण्यात आली आहे .

Share this: