पिंपरी चिंचवड पालिकेत नगरसेवकांच्या कार्यकत्यांने प्यायले ॲसिड ;आयुक्तांकडे तक्रार दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एका नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांने जेवण झाल्यावर ॲसिड पिल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.28) रोजी दुपारी पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरील क्रीडा समिती सभापतीच्या दालनात घडली आहे.त्या कार्यकर्त्याला उपचारासाठी हास्पिटलमध्ये दाखल केले आहे.
आप्पा गायकवाड असे ॲसिड पिलेल्या कार्यकत्याचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे नगरसेवक राजू बनसोडे यांचे कार्यकर्ते गुरूवारी दुपारी जेवणासाठी पालिकेच्या क्रीडा समितीच्या दालनात जेवणासाठी बसले होते. जेवण झाल्यावर त्यातील कार्यकर्ते आप्पा गायकवाड हे पाणी समजून ॲसिड पिले . त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला . त्यांनंतर उपचारासाठी त्यांना हास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. साफसफाई कर्मचाऱ्याांनी ॲसिडची बॉटल दालनात कशासाठी ठेवली . निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदार व त्यांच्या कर्मचाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी .त्या ठेकेदारांचे कंत्राट काढून घ्यावे , अशी मागणी क्रीडा सभापती उत्तम केंदळे व नगरसेवक राजू बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तांकडे केली आहे.