पिंपरी चिंचवड प्राधिकरण जमिन फसवणूक प्रकरणी भाजप नगरसेवकाला अटक
भोसरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मालकीची भोसरी येथील जागा स्वतःच्या मालकीची दाखवल्या प्रकरणी भाजप नगरसेवकांसह दोन जणांवर भोसरी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (दि 20) रोजी भोसरी प्राधिकरण सर्वे नंबर 22 या ठिकाणी घडली आहे.
याबाबत पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधि सहा . अभियंता , तथा क्षेत्रिय अधिकारी एस . एस . भुजबळ यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भाजप नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे (वय – 42 वर्षे , रा . भोसरी ) मनोज महेंद्र शर्मा (वय 38 भगतवस्ती , हनुमान नगर , भोसरी ) यांना पोलिसांनी अटक केली असून रविकांत सुरेंद्र ठाकुर ( वय – 40 वर्षे , रा .भोसरी) हा आरोपी फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र लांडगे याने नवनगर विकास प्राधि . सर्वे नं . 22 , भोसरी , पुणे ही प्राधिकरणाची जागा विकत असल्याचे दाखवून सर्वे नं 22 मधील 996 चौ . फुट जागा स्वतः मालक नसताना खोटे नोटराईज बनावट कागदपत्र बनवुन कुलमुखत्यारपत्र संमतीपत्र , ताबा पावती , ताबा साठेखत बनवुन आरोपी मनोज शर्मा आणि सुरेंद्र ठाकुर यांना विकुन त्यापोटी पंधरा लाख ऐंशी हजार रक्कम स्वीकारुन तसेच त्यांना राजेंद्र लांडगे हा मुळमालक नाही हे माहीत असतानाही त्यांनी पिंपरी चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाची जागा विकत घेतली व त्यावर अनाधिकृतपणे 1872 चौ . फुट बांधकाम बनावट कागदपत्राचा आधार घेवुन पिंपरीचिंचवड मनपा यांचेकडुन मिळकत कर पावती बनवुन घेतली व महाराष्ट्र राज्य विदयुत महामंडळ यांना ही बनावट कागदपत्र देवुन वीज कनेक्शन घेवुन शासनाची फसवणुक केली केली आहे. अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.