क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

जातीचा दाखला देण्यासाठी मागीतली लाच ; निगडीतील तो डाटा एन्ट्री ऑपरेटर गजाआड

निगडी (वास्तव संघर्ष ) : जातीचा दाखला देण्यासाठी लाच मागणाऱ्या निगडी येथील नागरी सुविधा केंद्रातील डाटा एन्ट्री ऑपरेटरला चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.ही कारवाई गुरूवारी (दि.2) फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे.

शैलेश अकांबरी बासुतकर (वय-41,) असे लाच घेणा-याचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड अंतर्गत निगडी येथील अपर तहसील कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात शैलेश याची नेमणूक आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या दोन लहान बहिणींचा जातीचा दाखला मिळण्यासाठी नागरी सुविधा केंद्रात अर्ज केला होता. अर्जावर कार्यवाही करून जातीचा दाखला देण्यासाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर शैलेश बासुतकर त्यांच्याकडे चार हजार रुपयांची लाच मागितली होती.त्यानंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.त्यानंतर त्याची 31 जानेवारी ते 1 व 2 फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली.

त्यात लाच मागत असल्याचे आढळून आल्याने गुरुवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच घेताना बासुतकर याला रंगेहाथ लाच स्विकारताना पकडण्यात आले.याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक संदीप वन्हाडे अधिक तपास करीत आहेत.

Share this: