पालकमंत्री चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी तीन पोलीस अधिकारी निलंबित
पिंपरी (वास्तव संघर्ष): पालकमंत्री चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन पोलीस अधिकारी आणि सात पोलीस कर्मचारी यांचे निलंबन करण्यात आले आहे.अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली आहे.
आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले की ,सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उप निरीक्षक या रँकच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.कर्मवीर भाऊराव पाटील , महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे वादग्रस्त विधान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परवा पैठण येथे केल्याने बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
या विधानाचा विरोध करण्यासाठी संध्याकाळी चंदक्रांत पाटील मोरया गोसावी यांच्या समाधी महोत्सवाचे उदघाटन करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती.