भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन
पुणे (वास्तव संघर्ष) :भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी (दि.22) निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
त्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार होत्या. 2017मध्ये पुणे महापालिकेवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली. त्यावेळी मुक्ता टिळक यांनी पुण्याच्या महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्या गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने आजारी होत्या. त्यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात उपचार सुरू होते. याच रुग्णालयात त्यांनी गुरूवारी अखेरचा श्वास घेतला.