चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी पक्षाचे नाना काटे हे उमेदवार असतील -जयंत पाटील
पिंपरी (वास्तव संघर्ष): चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. आज ते अर्ज भरणार आहेत .राष्ट्रवादी काँग्रेस च्या वाट्याला चिंचवडची ही जागा आली असून महाविकास आघाडीच्या वतीने नाना काटे अर्ज भरणार आहेत.
याबाबत अधिकृतरीत्या माहिती राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली ते म्हणाले.चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना काटे हे उमेदवार असतील.महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.
दरम्यान चिंचवड मधल्या या जागेच्या संदर्भाने अनेक दिवस चर्चा सुरू होती. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कालपर्यंत अर्ज न आल्याने ही निवडणूक बिनविरोध होते की काय अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र आज सकाळी पुन्हा नाना काटे यांनी अर्ज भरण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली असून पिंपरी चिंचवड मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नाना काटे अर्ज भरण्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.