बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज 14 जणांनी भरले 22 अर्ज

पिंपरी (वास्तव संघर्ष ): चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज अखेरपर्यंत 14 जणांनी 22 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.चिंचवड पोटनिवडणुक बिनविरोध व्हावा यासाठी भाजपने सर्व पक्षांना आव्हान केले होते मात्र या आव्हानाला कुणीच प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे.

31 जानेवारी 2023 पासून आजपर्यंत 123 जणांनी 220 उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर, 14 जणांनी 22 अर्ज दाखल केले आहेत. भाजप उमेदवार अश्विनी जगताप, भाजपचे पर्यायी उमेदवार म्हणून शंकर जगताप, अपक्ष मोहन म्हस्के, रवींद्र पारधे, बालाजी जगताप, गोपाळ तंतरपाळे, अमोल सुर्यवंशी, सिद्धीक शेख, किशोर काशीकर, मिलिंदराजे भोसले यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

तर पिंपरी चिंचवड महापालिकेचे निवृत्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, निवृत्त सहाय्यक आयुक्त सुभाष माछरे, तेजस माझिरे, गिरीश शेडगे, हरी महाले, चंद्रकांत खोचरे, मनोहर पाटील, विद्या पाटील, उत्तम सकटे, दीपक श्रीवास्तव, पृथ्वीराज थोरात, चंद्रकांत मोटे अशा 12 जणांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत.

Share this: