लक्ष्मण जगताप यांचे अखेरचे ते शब्द; वाचून तुम्हाला वाटेल अभिमान
चिंचवड (वास्तव संघर्ष) : राजकारण राजकारणाच्या जागी मात्र राजकारणात समाजकार्य करण्याचा मंत्र आमदार कै.लक्ष्मणभाऊ जगताप यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना दिला. म्हणून वेळोवेळी आपल्या विधानसभेतील भाषणात आमदार लक्ष्मणभाऊंनी स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी पोटतिडकीने प्रश्न मांडून ते सोडवले देखील.मात्र काळाने लक्ष्मणभाऊनां आपल्या पासून हिरावून घेतले. या दुखःतून जगताप परिवार सावरतो ना सावरतो तोच चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुक जाहीर झाली.चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी अर्ज दाखल केला आहे. तो याचसाठी की, जगताप परिवारावर असलेले जनतेचे अद्विगणित प्रेम.त्यामुळेच बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आठवले गट, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती व प्रहार संघटना यांनी अश्विनीताईना बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
प्रचारादरम्यान नागरिकांसोबत संवाद साधताना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप म्हणाल्या, “पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मोठमोठी विकासकामे या परिसरामध्ये करण्यात आली. बहुतांश आरक्षणे ताब्यात घेऊन विकसित करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना उद्याने, विरंगुळा केंद्र, कम्युनिटी हॉल, चांगले रस्ते यांसारख्या सुविधा मिळाल्या. परिणामी या भागाचा विकास झाला आणि त्याचा नागरिकांपर्यंत फायदा पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.”
दरम्यान, प्रचारादरम्यान भेटलेले नागरिक आपल्या भावना व्यक्त करताना म्हणत होते की , लक्ष्मणभाऊंनी आम्हाला कधीही परके समजले नाही त्यांनी आम्हाला नेहमीच घरच्या सारखीच वागणूक दिली. एकदा ते आजारी असताना म्हणाले होते, मी माझं पुर्ण आयुष्य चिंचवड विधानसभेतील नागरिकांसाठी दिले असून शेवटपर्यंत त्यांच्या कल्याणासाठीच काम करत राहील पण लक्ष्मणभाऊंचे हे शब्द आमच्यासाठी शेवटचे असतील कुणाला माहीत.. मात्र त्याचा वसा पुढे नेणा-या जगताप परिवाराला आम्ही कधीही दुरावा देणार नाही हे नक्की असे देखील ते म्हणाले..