पिंपरी-चिंचवड प्रधानमंत्री आवास योजनेचे ऑनलाईन अर्ज 28 जूनपासून सुरू
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत असून येत्या 28 जूनपासून नागरिकांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. पिंपरी आणि आकुर्डी मिळून 937 घरे उपलब्ध असून यासाठी नागरिकांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे.’सर्वांसाठी घरे’ या उपक्रमाअंतर्गत महापालिका क्षेत्रात पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेमध्ये आकुर्डी 567 घरं तसेच पिंपरी 3 70 घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 28 जून 2023 ते 28 जुलै 2023 पर्यंत करण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान आवास योजना आकुर्डीतील घरांसाठी लाभार्थी हिस्सा प्रति सदनिका 7,35,255 रुपये असून लाभार्थी हिस्सा प्रति सदनिका केंद्र शासन हिस्सा प्रति सदनिका – 1,50,000 रुपये मिळून 7 , 92,699 रुपयांपर्यंत लाभार्थींना घर मिळेल तसेच पिंपरीतील घरासाठी केंद्र शासन हिस्सा प्रति सदनिका 1,50,000 रुपयेराज्य शासन हिस्सा प्रति सदनिका1,00,000 रुपयेएकूण प्रति सदनिका किंमत रुपये 10,42,699 रुपये राज्य शासन हिस्सा प्रति सदनिका-1,00,000 रुपये एकूण प्रति सदनिका किंमत रुपये 9,85,255 रुपयांपर्यंत मिळेल.
या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया तारीख 28 जून 2023 रोजी सुरूवात होणार आहे.अर्ज करण्यासाठीhttps://pcmc.pmay.org या संकेतस्थावर जाऊन अर्ज भरण्याचे आव्हाहन करण्यात आले आहे. सदर नागरिकांकडून अर्जासोबत र.रु. 10,000/- इतकी अनामत रक्कम व नोंदणी शुल्क रु.500 असे एकूण 10,500/- रुपये जमा करायचे आहे. 2) सदर रक्कमयशस्वीरित्या भरल्यानंतर पुढील उर्वरीत कागदपत्रे अपलोड करावयाची आहे.. 3) सोडतीमध्ये 937 सदनिकांचे विजेता यादी असेल व प्रतिक्षा यादी 1 असणार आहे.