बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

ब्रिजस्टोन इंडियातर्फे मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट ऍवॉर्डचे वितरण

पिंपरी (वास्तव संघर्ष): ब्रिजस्टोन इंडिया या कंपनीच्या वतीने पुण्यातील निर्माण बहुउद्देशीय संस्थेला रस्ते सुरक्षाबाबत केलेल्या जनजागृतीसाठी तसेच विकासोन्मुख संस्थान, नवजीवन ऑर्गनायझेशन, युनायटेड वे ऑफ चेन्नई, मोवो सोशल इनिशिएटिव्ह फाऊंडेशन आणि रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांना मोबिलीटी सोशल इम्पॅक्ट पुरस्काराने गौरविण्यात आले. या संस्थांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामांबद्दल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक स्टेफानो संचिनी यांच्या हस्ते ३० लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले.

हिंजवडी येथे हा कार्यक्रम झाला. ओडिशातील ग्रामविकास मंडळावरील बिरेन भुता हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी ब्रिजस्टोन इंजिया कंपनीचे एमडी स्टेफानो संचिनी, कंपनीच्या ऑटोमोटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिंदम लाहिरी, दिल्लीतील नॅशलन असोसिएशन फॉर ब्लाइंडचे सरचिटणीस प्रशांत वर्मा, चैतन्यच्या मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. सुधा कोठारी आदी उपस्थित होते.

पुण्यातील निर्माण बहुउद्देशिय विकास संस्था रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करते. जयपूर येथील विकासोन्मुख संस्थान कृषी यांत्रिकीकरणासाठी, तिरूपती येथील नवजीवन ऑर्गनायझेशन सफाई कामगारांसाठी काम करते. तमिळनाडूमधील युनायटेड वे ऑफ चेन्नई ही संस्था कर्करोगाच्या तपासणीसाठी मोबाईल रुग्णवाहिका प्रदान करते. तसेच मोवो सोशल इनिशिएटिव्ह फाऊंडेशन आणि गुजरात येथील जनविकास ट्रस्ट या संस्थांना मोबिलिटी फॉर एम्पॉवरमेंट ऑफ वलनेरेबल ग्रुप्स या श्रेणीत संयुक्त उपविजेतेपद देण्यात आले.

स्टेफानो संचिनी म्हणाले, “शाश्वतता ब्रिजस्टोनच्या केंद्रस्थानी असून आमच्या व्यवसाय आणि कामकाजाच्या प्रत्येक भागात गुंफलेली आहे. आपल्या व्यवस्थेतील सर्व सहयोगी घटक एकत्र येऊन आगामी पिढ्यांसाठी मूल्य रुजवतील तेव्हा प्रभावीपणे ध्येय गाठणे शक्य होईल. समाजातील शेवटच्या घटकांतील नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार देणे खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले

Share this: