नेहरूनगरमध्ये तरूणावर कोयत्याने वार
पिंपरी (वास्तव संघर्ष) : मित्राला मारहाण केल्याचा गैरसमज करून घेत दहा ते अकरा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर तलवार आणि कोयत्याने वार करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 6) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास महेशनगर, नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.
तोहीद अस्लम शहा (वय 21, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सलीम पटेल, सुनील वग्गी, जुबेर शेख, शुभम दुबे (चौघे रा. कासारवाडी), सुशांत सोनवणे (रा. बोपोडी) आणि अन्य पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोहीद यांनी आरोपी यांचा मित्र आयान याला मारहाण केल्याचा गैरसमज आरोपींना झाला. त्यातून आरोपींनी तोहीद यांच्यावर तलवार आणि कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.