भिमाकोरेगाव विजयस्तंभास तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार – रामदास आठवले
पुणे – भीमकोरेगाव येथील विजयस्तंभ परिसरास तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार तसेच या परिसराच्या विकासासाठी राज्यसरकार ने ६३ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे त्यात वाढ करून भीमकोरेगाव विकास आराखडा १०० कोटींचा करण्यात यावा त्यासाठी केंद्रसरकार तर्फे सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. भिमाकोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभास आज शौर्यदिनी ना रामदास आठवलेंनी अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते.
भीमकोरेगाव विजयस्तंभ येथे मराठा समाजाच्या सरपंचांकडून ना रामदास आठवलेंचे स्वागत करण्यात आले.
यावर्षी आंबेडकरी जनता १५ लाखांहून अधिक इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावर्षी आंबेडकरी जनतेने तसेच मराठा समाजाने शांतता पाळल्याबद्दल दोन्ही समाजाचे ना रामदास आठवलेंनी आभार मानले.
भीमकोरेगाव परिसरात मराठा समाजाने विविध ठिकाणी आंबेडकरी अनुयायांसाठी पाणी चहा नाश्ता ची सोय करून स्वागत केले.
दलित मराठा समाजात कायम सामाजिक सलोखा नंदावा
छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने राज्यातील दलित आणि मराठा समाजाने एकत्र नांदावे. आज दाखविलेला सामाजिक सलोखा दोन्ही समाजाने कायम राखून सलोख्याने बंधुतेने नांदावे असे आवाहन ना रामदास आठवलेंनी केले.
आंबेडकरी अनुयायांचा गर्दीचा उच्चांक
यंदा भीमकोरेगाव विजयस्तंभ परिसरात आंबेडकरी अनुयायांच्या गर्दीने उच्चांक गाठला. १५ लाख लोकांहून अधिक आंबेडकरी अनुयायी यावेळी भीमकोरेगावला उपस्थित होते. या गर्दीमुळे केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले ट्रॅफिक जॅम मध्ये 3 तास अडकले होते. रिपाइं तर्फे आयोजित जाहीर अभिवादन सभा पेरणे फाटा येथे आयोजित केली होती. त्या सभास्थळी जाण्यास ट्रॅफिक जॅम मुळे ना आठवलेंना ३ तास उशीर झाला.
यंदाच्या १ जानेवारी शौर्यदिनानिमित भीमकोरेगाव विजयस्तंभ परिसरात राज्यशासन आणि पोलीस प्रशासनाने उत्तम व्यवस्था ठेवल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे ना रामदास आठवलेंनी अभिनंदन केले.