बातम्यामहाराष्ट्र

  ‘धडक बसून पादचारी ही मेला, आता पादचाऱ्यांनाही सक्तीने हेल्मेट घाला

पुणेरी पाट्या ने प्रसिद्ध असलेले पुणे तेथे काय उणे असेच म्हणावे लागेल हेल्मेट सक्ती चा विरोध करण्यासाठी एका पुणेकरांने चक्क आपल्या गळ्यात धडक बसून पादचारी ही मेला, आता पादचाऱ्यांनाही सक्तीने हेल्मेट घाला..अशा आशयाचे फलक लावून हेल्मेट सक्तीचा विरोध केला आहे.

पुणे- शहरात एक जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घालणार्‍या दुचाकी चालकावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तर या हेल्मेट सक्तीच्या कारवाई विरोधात अनेक पुणेकर नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. याच पार्श्‍वभूमीवर पुण्यातील बाळासाहेब रुणवाल हे दुचाकीवरून जाताना किंवा चालत असताना हेल्मेट घालून प्रवास करीत आहे.  ‘धडक बसून पादचारी ही मेला, आता पादचाऱ्यांनाही सक्तीने हेल्मेट घाला’ अशा मजकुराचा पोस्टर गळ्यामध्ये घालून बाळासाहेब रुणवाल हे फिरत आहे. जाणार्‍या आणि येणार्‍या नागरिकांचे ते लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान बाळासाहेब रुणवाल म्हणाले , दुचाकी चालविताना प्रत्येक नागरिकांनी हेल्मेट घातले पाहिजे. अशी सक्ती पुणे पोलिसांकडून केली जात आहे. हेल्मेट घातलेले कोणी न दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करणे ही चुकीची बाब आहे. ज्याना हेल्मेट घालायचे असेल त्यांनी घालावे. मात्र सक्ती करता कामा नये. तर मागील दोन दिवसापासुन मी देखील हेल्मेट घालत आहे. पण हेल्मेट सक्तीच्या विरोधात घालत असून नागरिकांमध्ये प्रबोधन देखील करीत आहे. त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत पोलिसानी हेल्मेट सक्ती रद्द करावी. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

Share this: