Videoमाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी पालिकेच्या कारभाराला वैतागलेल्या अपंगानी अधिका-यांच्या खुर्चीला चढवला फुलांचा हार

वास्तव संघर्ष

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पालिकेतील अपंग कल्याणकारी समन्वय अधिकारी स्मिता झगड़े यांच्या कार्यालयात चक्क अपंगानी हार घालत निषेध व्यक्त केला.

कल्याणकारी अपंग योजना माहीती करुन घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड प्रहार अपंग संघटनेतील सभासद याठीकाणी आले होते. परंतू तास उलटून गेला तरी अधिकारी जागेवर येत नव्हत्या, वैतागलेल्या अपंगानी अधिका-यांच्या खुर्चीला फुलांचा हार चढवत निषेद व्यक्त केला.

दरम्यान यासंदर्भात अपंग कल्याणकारी समन्वय अधिकारी स्मिता झगड़े यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Share this: