महाराष्ट्र

डॉ. आनंद तेलतुंबडे यांना तातडीने मुक्त करण्याचे पुणे न्यायालयाचे आदेश

पुणे – डॉ. आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती . पुणे पोलिसांनी मुंबईत ही कारवाई केली होती . विलेपार्ले पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी सुरु होती. आनंद तेलतुंबडे यांच्यावर भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोप आहे. त्यामुळे त्यांना आज पुणे न्यायालयात आणले होते परंतू डॉ. आनंद तेलतुंबडे यांना झालेली अटक ही बेकायदेशीर असून त्यांना तातडीने मुक्त करण्याचे आदेश पुणे सञ न्यायालयाने दिले आज दिले आहेत. तेलतुंबडे यांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली होती. आजच्या निर्णयाचा मला आनंद आहे, पण शुक्रवारपासून मी जो अपमान भोगला आहे तो वर्णन करता येण्यासारखा नाही, अशी प्रतिक्रिया तेलतुंबडे यांनी दिली.

आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते . यावेळी त्यांचे वकील रोहन नाहर यांनी डॉ. तेलतुंबडे यांना झालेली अटक बेकायदेशीर असल्याचा बचाव सादर केला. पोलिसांच्या वतीने अॅड. उज्ज्वला पवार यांनी तेलतुंबडे यांना करण्यात आलेली अटक ही कायदेशीर प्रक्रियेनुसार असल्याचं सांगितलं. उच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांचा जामीन फेटाळला आहे. त्यांना सुप्रीम कोर्टाने दिलेले संरक्षण हे जामीन मिळवण्यासाठी होता, असं त्या म्हणाल्या.

न्यायालयाने नाहर यांनी मांडलेला बचाव ग्राह्य मानून तेलतुंबडे यांना तातडीने मुक्त करण्याचे आदेश दिले. तेलतुंबडे यांना अटकपूर्व जामीन घेण्यासाठी ११ फेब्रुवारीपर्यंत कालावधी आहे. या कालावधीत ते दाद मागू शकतात, असा आदेश सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी दिला आहे. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांची कृती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे उल्लंघन करणारी आणि अवमान करणारी आहे, असं निरीक्षण वडणे यांनी नोंदवलं आहे. हा निकालाची माहिती सुप्रीम कोर्टाला दिली जावी, असंही त्यांनी आदेशात म्हटलं आहे.

Share this: