धक्कादायक! भिमाकोरेगाव विजयस्तंभ परिसरात दिवसाढवळ्या मटका जुगार अड्डा ;पोलिसांचे माञ दुर्लक्ष
पुणे (वास्तव संघर्ष) :भिमाकोरेगाव येथे दरवर्षी लाखो करोडो भिमअनुयायी १ जानेवारीला येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येत असतात.१ जानेवारी १८१८ रोजी लढाई करून जिंकल्यामुळे महार बटालियन यांचे शौर्याचे प्रतीक म्हणून देशभरात या विजयस्तंभाचे नावलौकिक आहे. त्यामुळे दरवर्षी राज्य आणि पोलीसप्रशासन देखील येथे सुरक्षा कमी पडू देत नाही. मात्र १ जानेवारीनंतर भिमाकोरेगाव विजयस्तंभाकडे पोलीस फिरकत नसल्याने या संधीचा फायदा घेत येथील जागेवर मटका जुगार, सोरट, कल्याण मटका जुगार, मुंबई मटका जुगार चालू आहे.
भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या जवळपास अंतरावर चक्क हा मटक्याचा अड्डा चालविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे , वास्तव संघर्ष च्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार पञाशेड टाकून लावलेल्या पडद्याच्या संशय आल्याने आत मध्ये जाऊन पाहणी केली असता; ही बाब समोर आली,
दरम्यान पञाशेड टाकून बनवलेला हा जुगार अड्डा ज्या जागेवर आहे त्या जागा मालकाचे नाव किसनराव वाघमारे आहे . मात्र, हा मटक्याचा अड्डा पोलीस पोलीस प्रशासनाच्या आर्शिवादानेच चालू आहे असा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी केला आहे. हा मटक्याचा अड्डा बंद करावा यासाठी सामाजिक कार्यकर्ता अजय लोढें आणि भिमाकोरेगाव पिडीत कुटुंब जयदीपभैया सकट यांनी पोलिसांना पञ दिले आहे.