प्रसिध्दीसाठी टीका करणा-या राज ठाकरे यांनी स्वतः दुष्काळग्रस्तांना पैसे द्यावे – युवराज दाखले
मुंबई (वास्तव संघर्ष) राज्यभरात नागरिकांना दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे, राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त भागाला मदत करण्याचे काम सुरु आहे. विरोधी पक्षातील नेते देखील राज्यभरात फिरत दुष्काळाचा आढावा घेत आहेत.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी दुष्काळाच्या परिस्थितीवरून मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसिंचनाची कामे झाली म्हणतात तरी दुष्काळ कसा ? असा सवाल त्यांनी केला होता.
दरम्यान, आता शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष- युवराज दाखले यांनी राज ठाकरेंना उत्तर देत, जलसिंचन झाले तरी दुष्काळ कसा ? हा प्रश्न ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत त्यांना विचारावा, असा टोला दाखले यांनी लगावला आहे.
दुष्काळामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार काम करत आहे. युती सरकारवर जलसिंचनात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही,विनाकारण प्रसिध्दीसाठी टिका करण्या पेक्षा स्वताजवळ आसलेल्या गोळा केलेल्या रकमेतुन थोडीफार मदत करून दुष्काळग्रस्त भागाला दिलासा द्यावा आसा टोला युवराज दाखले यांनी लगावला.