हाॅटेल आणि धाब्यावर गाढवांचे मटन विकणारी टोळी अटक
मुंबई(वास्तव संघर्ष) राज्य सरकारने गाढवाची संख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त करत गाढवांचे संवर्धन करावे असे आदेश दिले आहेत. तर याच गाढवांची काही दिवसांपूर्वी तस्करी करणारे आरोपी पोलिसांनी पकडले होते.
माञ आता एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे चक्क गाढवांची कत्तल करुन त्यांचे मटन कमी दरात विक्री केली जात आहे. ही घटना पंढरपूर येथील हाॅटेल आणि धाब्यावर घडली आहे यातील आरोपी हे आंध्र प्रदेशातील आहेत यांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशातील ही टोळी रस्त्यावर फिरत असलेल्या गाढवांना पकडून त्यांची कत्तल करत व त्यांचे मटन कमी दरात हाॅटेल आणि धाब्यावर कमी दरात विक्री करत असत.
सदर आरोपी राञीचा गैरफायदा घेत गाढव चोरी करत होती. राञीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना या आरोपीवर संशय आला त्यावरून त्याच्याकडून गुन्ह्याची कबुली दिली आहे.या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक तपास पंढरपुर पोलिस करीत आहेत.