बातम्या

बारामती येथे प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन

बारामती दि.२५ (प्रतिनिधी): स्वातंत्र्यानंतर घटनेत समतेचे तत्त्व आपण स्वीकारले; पण आजही मनुस्मृतीच्या पाठबळाने काही अपप्रवृत्तींकडून भेदभाव केला जातो. मनुस्मृती मध्ये अस्पृश्य, शूद्र व स्त्रियांबद्दल अन्यायकारक काही कायदे/श्लोक सुद्धा होते.तसेच मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे छ.शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला गेला होता. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी सर्वप्रथम मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन केले होतेे.त्याचे भान जागृत ठेवण्यासाठी बारामती येथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
यावेळी शेरसुहास मित्र मंडळाचे शुभम अहिवळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी व भिमसैनिकांनी बारामती येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती स्मारकास अभिवादन करून महिलांच्या हस्ते प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.या प्रसंगी महिलावर्गाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता.यामध्ये सेजल अहिवळे, अश्विनी भोसले,सौरवी अहिवळे,प्रेरणा अहिवळे, राजश्री अहिवळे या महिलांसह सागर कांबळे,सोमनाथ कदम,नगरसेवक गणेश सोनवणे,दादा मागाडे,रितेश गायकवाड,बंडू साळवे,सचिन साळवे,अजय मागाडे,मंगलदास निकाळजे,मयुर कांबळे,दिपक अहिवळे,सुमित सोनवणे,सिद्धांत सावंत आदी भीमसैनिक उपस्थित होते.

Share this: