लॉ प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर, 3 वर्षाच्या LLB प्रवेश परीक्षांचे निकाल घोषित
मुंबई :वकिलीचा अभ्यास करून परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्राच्या CET Cell नं निकाल घोषित केलेत. MH CET 2019 लाॅचे निकाल जाहीर झालेत. 3 वर्षाच्या LLB प्रवेश परीक्षांचे निकाल घोषित झालेत. MH CETच्या आॅफिशियल वेबसाइटवर ते पाहता येतील. ही वेबसाइट आहे info.mahacet.org.
या परीक्षेत प्रियांका उदय मशेळकर ही 133 गुणांनी अव्वल ठरलीय.
हा निकाल वेबसाइटवर पुढीलप्रमाणे पाहा
आॅफिशियल बेवसाइटवर जा.
त्यात Result PDF List लिंकवर क्लिक करा
मग PFD लिस्ट उघडेल. त्यानंतर तुमचे नंबर आणि नावावरून निकाल शोधता येईल.
स्क्रीनवर रिझल्ट दिसेल
याआधी राज्याच्या CET Cell नं MH CET रिझल्ट 2019 घोषित केला होता. तो 5 वर्षाच्या LLB कोर्ससाठी होता. त्यात उत्तीर्ण झालेले 5 वर्षांचा LLB अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतील. MH CET लाॅ रिझल्ट PDFमध्ये जाहीर झालाय.
याची आॅफिशियल वेबसाइट आहे mahacet.org. यावर ही PDF अपलोड करतात. यात रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर , नावं आण मार्कस् असतात. पुढच्या फेरीसाठी निवडला गेलेला उमेदवार CET घेत असलेल्या CAP मध्ये भाग घेईल. CAP म्हणजे सेंट्रलाइज अॅडमिशनन प्रोसेस. 3 वर्षाच्या LLB अभ्यासक्रमासाठी प्रवेश करणाऱ्यांना या प्रक्रियेतून जावं लागतं. यात उत्तीर्ण झाल्यावर पुढे वकिलीचा अभ्यास करायला संधी मिळते.