बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

तमिळनाडूतील डॉ. आंबेडकर पुतळा विटंबनाप्रकरणी पिंपरीत आंबेडकरी जनतेचा निषेध मोर्चा

पिंपरी (वास्तव संघर्ष) तमिळनाडूतील नागापट्टीणम जिल्ह्यातील वेदरनयाम येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . 25 ऑगस्टला वेदरनयाम येथे दोन गटात झालेल्या वादानंतर पुतळ्याची विटंबना करण्यात आली. याची माहिती शहरात पसरल्यानंतर तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांना येथे पाचारण करण्यात आले व परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

तमिळनाडूत घडलेल्या या घटनेचे पडसाद पिंपरी-चिंचवड शहरात देखील उमटायला सुरवात झाली असून,पिंपरी-चिंचवड मधील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आरपीआय (आठवले गट) आणि शहरातील अनेक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असे नारे देण्यात आले. यावेळी सुरेश निकाळजे, चंद्रकांता सोनकांबळे,अनिता सावळे, संगिता शहा, रुहिनाज शेख, अंजना गायकवाड भारत मिरपगारे, अजय लोंढे ईत्यादी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि शहरातील हजारो जनता उपस्थित होती.

सोशल मीडियावरही या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.तमिळनाडूतील विरोधी पक्षातील द्रमुक नेत्यांकडून सत्ताधारी अण्णा द्रमुकवर आरोप करण्यात आले आहेत. जातीयवादी शक्ती या घटनेमागे असल्याचा आरोप द्रमुकने केला आहे. विटंबना झालेल्या पुतळ्याच्या ठिकाणी नवा पुतळा उभारण्यात आला असून, आज सर्व व्यवहार सुरळीत आहेत.

Share this: