‘नरेंद्र-देवेंद्र…बेरोजगारीचे केंद्र’ घोषणेसह राष्ट्रवादी युवकचे एक्सप्रेस वे वर ठिय्या आंदोलन
पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- नरेंद्र -देवेंद्र …बेरोजगारीचे केंद्र, गाजर नको रोजगार हवा.. अशा घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज आक्रमक आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरील उर्से टोल नाका येथे ठिय्या आंदोलन करत तब्बल दीड तास महामार्ग बंद ठेवला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे, पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, युवा नेते शेखर ओव्हाळ , पुणे जिल्हा युवा अध्यक्ष सचिन घोटकुले ,पुणे शहराध्यक्ष महेश हांडे, राकेश कामठे, शैलेश मोहिते, किशोर मासाळ ,अजय आवटे, आदि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे विविध मागण्यांसाठी हे युवा आक्रोश आंदोलन करण्यात आले दरम्यान उर्से टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दरम्यान या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती