जागतिक बातम्याबातम्यामनोरंजन जगत

‘दीपवीर’चे बंगळूरात ग्रँड रिसेप्शन

बंगळूर : नुकतेच इटलीत विवाहबद्ध झालेले बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी म्हणजेच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचे लग्नानंतरचे पहिले रिसेप्शन बंगळूरमध्ये बुधवारी रात्री पार पडले. या रिसेप्शनला अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.

या दोघांचा विवाह इटलीतील लेक कोमो शहरात थाटामाटात पार पडला होता. बंगळूरमध्ये पार पडलेल्या रिसेप्शनमध्ये दीपिकाने सोनेरी रंगाची साडी परिधान केली होती. तर, रणवीरने शेरवाणी परिधान केला होता. सबस्याची या डिझायनरने खास त्यांच्या रिसेप्शनसाठी याचे डिझाईन बनविले होते. दीपिकाला ही साडी तिच्या आईने भेट दिली होती. दीपिकाच्या अनेक दागिनेही परिधान केल्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.

दीपिका आणि रणवीर नुकतेच मुंबईत परतले होते. या दोघांचे मुंबई विमानतळावरील फोटो काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघांच्या लग्नाच्या ड्रेसपासून गृहप्रवेशापर्यंत प्रत्येकाला उत्सुकता होती. इटलीत कोंकणी आणि सिंधी पद्धतीने “दीपवीर’चा विवाहसोहळा पार पडल्यानंतर आता मुंबईतही एक जंगी रिसेप्शन पार्टी होणार आहे. त्या पार्टीत “दीपवीर’ कोणत्या पेहरावात पाहायला मिळणार आणि कोणकोणते सेलिब्रेटी उपस्थित राहणार, ते पाहणं रंजक ठरेल.

या दोघांचा विवाह इटलीतील लेक कोमो शहरात थाटामाटात पार पडला होता. बंगळूरमध्ये पार पडलेल्या रिसेप्शनमध्ये दीपिकाने सोनेरी रंगाची साडी परिधान केली होती. तर, रणवीरने शेरवाणी परिधान केला होता.

Share this: