बातम्यामहाराष्ट्र

शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत रिपब्लिकन पक्षाचे नाव पुसू देणार नाही – रामदास आठवले

मुंबई (वास्तव संघर्ष) – बरेच लोक रिपब्लिकन पक्षाला मोडीत काढायला निघालेले आहेत.मात्र माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत रिपब्लिकन पक्षाचे नाव कुणाला पुसू देणार नाही अशी भीमगर्जना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सिद्धार्थ कॉलनी चेंबूर येथे केली. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने चेंबूररत्न पुरस्कार आणि रुग्णवाहिकेचे लोकार्पण ना रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिपाइं महिला आघाडी च्या राष्ट्रीय मार्गदर्शक सौ. सीमाताई आठवले; कुमार जित आठवले; तानाजी गायकवाड ; रवी गायकवाड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

यापूर्वी कधी ही रिपब्लिकन पक्षाचा ईशान्य भारतात झाला नव्हता. मात्र आपल्या नेतृत्वात नागालँड; मणिपूर; आसाम; ओरिसा; अरुणाचल प्रदेश या भागात रिपब्लिकन पक्ष मोठया प्रमाणात वाढत आहे. पश्चिम बंगाल; झारखंड; छत्तीसगढ;यूपी; एम पी तसेच आंध्र; कर्नाटक;तामिळनाडू; तेलंगणा; केरळ तसेच उत्तरेत पंजाब; राजस्थान सह सर्व भारतात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष आपण पोहोचविला आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष हा प्रवाह आहे. हा प्रवाह कुणासाठी थांबणार नाही.

रिपाइं चा प्रवाह पुढे पुढे जात राहील असे ना रामदास आठवले म्हणाले. सिद्धार्थ कॉलनीतील नऊ तरुणांनी रिपब्लिकन ऐक्यासाठी उपोषण केले. सिद्धार्थ हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या माझ्या सारख्या पँथरच्या पाठीशी सिध्दार्थ कॉलनी सारख्या आंबेडकरी वस्त्यांतील तरूण उभे राहिले त्यामुळे मी राज्यात चार खात्यांचा कॅबिनेट मंत्री झालो. तीन वेळा लोकसभेत निवडून आलो. आता राज्यसभेत खासदार आणि केंद्रियमंत्रीमंडळात पोहोचू शकलो. इतर नेत्यांवर टीका न करता मी माझी भूमिका कशी योग्य आहे ते मांडत राहिलो. आमच्या पँथर ची भूमिका कुणावर हल्ला करणार नाही पण हल्लेखोरांना चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही अशी होती असे ना रामदास आठवले म्हणाले. यावेळी लोकगायिका कडूबाई खरात आणि लोकगायक चंद्रकांत शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम सादर झाला. यावेळी मोठया संख्येने लोक उपस्थित होते.

Share this: