बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

मुंबई विद्यापीठाचे नामांतर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करा-युवराज दाखले

पिंपरी (वास्तव संघर्ष) : मुंबई विद्यापीठाचे नामातंर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करावे, ही मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष शिवशाही व्यापारीसंघ तथा प्रदेश संघटक भारतीय लहुजी पॕंथर युवराज दाखले यांनी केली .

युवराज दाखले यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे संयुक्त महाराष्ट्रचा आवाज अण्णाभाऊ साठे यांनी बुलंद केला. कामगार,कष्टकरी,समतावादी चळवळ उभी केली. भारत-रशिया मैत्रीपूर्ण संबध त्यांनी दृढ केले. त्यांच्या अजरामर साहित्याने समाज जागृती केली,या भूमीपुत्राचे नाव मुंबई विद्यापीठाला दिल्यास विद्यापीठाचा गौरव वाढणारा आहे.

म्हणून ही आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. तरी आपण गांभीर्याने विचार करून मुंबई विद्यापीठाला साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे मुंबई विद्यापीठ असे नामविस्तार करून मातंग समाजा बरोबर अखंडबाराबलुतेदार समाज बांधवांचा  सन्मान करावा.

Share this: