बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

शहराला पाणीकपात केल्याच्या निषेधार्थ हंडाफोडो आंदोलन;मनसैनिकांचा आक्रमक पवित्रा

पिंपरी (वास्तव संघर्ष ): पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणात ९६ टक्के पाणीसाठा असताना देखील शहरात पाणी कपात सुरु आहे नागरिकांना एकदिवसाआड पिण्याचे पाणी मिळत आहे माञ दररोज शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी मुबलक पाणी आहे . या विरोधात सोमवारी महापालिकेवर मनसे हंडा मोर्चा काढला . मनसेने महापौरांच्या गाडी समोर रिकामे मडके फोडत निषेध केला तर . शहरात दिवसाआड सुरू असलेली पाणी कपात रद्द करा, अन्यथा पाणीपट्टी पन्नास टक्केच भरू असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मनसेचे गटनेते तथा शहराध्यक्ष सचिन चिखले, हेमंत डांगे
अश्विनीताई बांगर, सिमाताई बेलापुरकर, सुजाता काटे
विशाल मानकरी, अनिता पांचाळ, वैशाली बौराटे
नितिन चव्हाण, अक्षय नाळे, मयूर कांबळे, प्रतिक शिंदे
विकास कदम, अजय अड़गळे, नारायण पठारे, तेजस दाते, सुजय शिंदे, दीपेन नाईक, नितिन कावळे, अधिकराव पोळ
राजू सावळे, चंद्रकांत दानवे, सुरेश सकट, मयूर चिंचवडे
दत्ता देवतरासे, रूपेश पटेकर, स्वप्निल महंगरे रोहित काळभोर
संगीता देशमुख, स्नेहल बांगर, श्रद्धा देशमुख आदी मनसे सैनिक उपस्थित होते.

Share this: