पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघात परिवर्तन.. अंबर चिंचवडे यांचा पॅनल विजयी..!
पिंपरी (वास्तव संघर्ष ) – पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघासाठी झालेल्या निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्यात अंबर चिंचवडे यांना यश आले आहे. चिंचवडे यांच्या आपला महासंघ पॅनलने चुरशीच्या लढतीत बाजी मारत महासंघावर कब्जा केला.
न्यायालयाच्या आदेशाने शुक्रवारी झालेल्या मतदानाचे निकाल आताच हाती आले असून महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागल्याने झिंजुर्डे यांचे महासंघावरील गेल्या १५ वर्षातील वर्चस्व आज संपुष्ठात आले.
पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचाऱयांनी आज परिवर्तन घडवून आणले तर या विजयाचे अंबर चिंचवडे हे शिल्पकार ठरले आहेत.महापालिकेच्या एकूण 6989 मतदानापैकी 5533 कामगारांनी मतदान केले. सकाळी 7 ते सांयकाळी 4 पर्यंत उत्स्फूर्त झालेल्या मतदानात 81.41 टक्के मतदान झाले.
सुरुवाती पासूनच प्रचंड उत्सुकता असलेली ही निवडणूक अटीतटीची झाली शिवाय या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे यावर्षी निवडणुकीत पडद्याआडून राजकीय पुढारी व पालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी सहभाग घेतल्याचे दिसून आला,तर पालिकेचे शिक्षक यांचा मोठा सहभाग दिसला.
आपला कर्मचारी महासंघाचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे…
1)अंबर चिंचवडे2)अभिमान भोसले3)सुप्रिया सुरगुडे4)योगेश रसाळ5)बाळासाहेब कापसे6)अविनाश ढमाले7)धनाजी नखाते8)गोरख भालेकर9)शुभांगी चव्हाण10)विलास नखाते11)अमित जाधव12) सुरेश गोरगोटे13)बाळू साठे14)अनिल राऊत15)धनेस्वर थोरवे16)अविनाश तिकोणे17)रंजीत भोसले18)सुभाष लांडे19)मिलिंद काटे20)नवनाथ शिंदे21)योगेश वंजारे.