क्राईम बातम्याबातम्या

पिंपरी चिंचवड:४० लाख रुपयांच्या खंडणीसाठी मित्रानेच केला मित्राचा खून

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड मधील भोसरीतील एका व्यावसायिकाच्या १७ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहाद तय्याब सिद्दीकी( वय- १७ रा.दापोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून उमर नसीर शेख (वय- २१ रा.खडकी) असे आरोपी  नाव आहे.   मित्रानेच मित्राचे ४० लाख रुपयांसाठी अपहरण करून खून केल्याची घटना घडली आहे. आरोपीला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमर नसीर शेख याने  मित्राचे अपहरण करत ४० लाख रुपयांची खंडणी उकळायची अशी योजना आखली. त्यानुसार, रात्री साडेआठच्या सुमारास दापोडी येथील अब्दुलच्या घरी जाऊन त्याला दुचाकीवरून पुण्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस येथे घेऊन गेला. दोघांमध्ये बिअरची पार्टी झाली. त्यानंतर मात्र आरोपी उमरने मित्राचा गळा आवळून खून केला. दरम्यान, मयत अब्दुलच्या घरच्या व्यक्तीला फोन लावून ४० लाख रुपयांची खंडणी मागितली. परंतु, मयत अब्दुलचे वडील हे भंगारचा व्यवसाय करत असल्याने त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते. आरोपी उमरला कोणीतरी चुकीची माहिती दिली होती. त्यांच्याकडे खूप पैसे आहेत असं सांगण्यात आलं होतं. आरोपीला महागडी कार घ्यायची होती.असे पोलिसांनी सांगितले

Share this: