बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

अरे देवा…! शिक्षक पात्रता परीक्षेत राज्य परीक्षा परिषदच अपात्र ; विद्यार्थ्यांना मानसिक त्रास

File Photo

पिंपरी (वास्तव संघर्ष) प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिकवण्यासाठी शिक्षकांची पात्रता तपासणारी राज्य परीक्षा परिषदच रविवारी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत ( टीईटी ) अपात्र ठरली आहे . शिक्षकांची पात्रता तपासणाऱ्या या परीक्षेच्या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत प्रचंड चुका झाल्या आहेत. केवळ शब्दांच्याच नव्हे तर प्रश्नच्या प्रश्नच चुकीच्या शब्दांचे टाकण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रमाणात गोंधळ उडाला आहे…

राज्यातील जवळपास ३ . ४३ लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे. २०१३ पासून शिक्षक पात्रता परीक्षा सुरू करण्यात आली होती . राज्य सरकारने भावी शिक्षकांसाठी सीईटीसोबतच टीईटी अनिवार्य केली आहे . त्यातही अध्यापनशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकेत प्रचंड घोळ झाल्याने विद्यार्थ्यांना धड प्रश्नांचा अर्थही समजण्यात आला नाही,त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास झाला. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?

याबाबत परीक्षा परिषदेचे अध्यक्ष जगताप म्हणाले , टीईटी परीक्षेतील याची चुकांबाबत तज्ज्ञांची समिती गठित महाराष्ट्रात करण्यात येईल . प्रश्नपत्रिकांतील मुद्रण दोषांसह अन्य चुकांचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल , याचा अभिप्राय समितीकडून आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात यईल . पुढील वर्षी परीक्षा परीक्षा परिषदेच्या वतीने टीईटी परीक्षेची दोन निर्दोष प्रश्नपत्रिका काढण्यात येतील .

Share this: