विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण घेऊन छात्रशिक्षक सेवाकाल शिबिराचा समारोप ; नांदेड कुसुमताई अध्यापक महाविद्यालयांतील उपक्रम
नांदेड(प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील शिक्षणशास्त्र संकुलातील एम . एड . प्रथम वर्षाचा छात्रशिक्षक सेवाकाल शिबिर कुसुमताई अध्यापक महाविद्यालयात दि . 04 / 02 / 2020 पासून प्रा . डॉ . अशोक गिनगिने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आला होता.
कुसुमताई अध्यापक महाविद्यालय नांदेड मध्ये हा उपक्रम राबविण्यात आल्याने विद्यार्थी वर्ग देखील खुष होते. अध्यापनाचे कार्य सुरळीतपणे पार पाडून विद्यार्थ्यांच्या अनेक स्पर्धाचेही यावेळी नियोजन करण्यात आले होते. इंग्रजी माध्यमाचे शिक्षक पुंडलिक गच्चे यांनी इंग्रजी विषयाची भिती वाटू नये यासाठी इंग्रजी या विषयावर विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधतानाच इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिका लावून घेतल्या विद्यार्थीचे मुल्यमापन केले. आज रोजी 15/2/2020 रोजी या उपक्रमाची सांगता झाली. दहा दिवस सुरू असलेल्या या उपक्रमाचे अनेक एम एड काॅलेजने स्वागत केले समारोपप्रसंगी पुंडलिक गच्चे सर आणि इंग्रजी माध्यमांच्या शिक्षिका अनुताई यन्नम मॅडम यांच्या हस्ते प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
या समारोप समारंभप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ . राऊत मॅडम ,होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून . डॉ . गिनगिने सर , कदम सर , अल्ताफ सर उपस्थित होते .
या शिबिरामध्ये अजय पाटील , सचिन काळे , पुंडलिक गच्चे , संतोषी पेशवे , पुजा कंरजे , अनुताई यन्नम , शांतीप्रिया कांबळे , स्वाती राजे यांनी सहभाग नोंदविला आहे .