वास्तव संघर्ष बातमीचा ईपॅक्ट :सर्व कर्जाचे हप्ते तीन महीने स्थगित ;आरबीआयची महत्त्वाची घोषणा
पिंपरी (वास्तव संघर्ष ) -भारतात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे याच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी रिझर्व बँकेच्या वतीने सर्व कर्जाचे हप्ते तीन महिने स्थगित केल्याची घोषणा नुकतिच करण्यात आली आहे.रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. याबाबत सर्वात प्रथम बातमी वास्तव संघर्ष ने दिली असल्याने वंचीत बहुजन आघाडी आणि संघर्ष टुरिस्ट चालक मालक संघटनेने वास्तव संघर्ष चे आभार मानले आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील घेतली होती दखल
रिझर्व बँकेने सर्व कर्जाचे हप्ते तीन महिने स्थगित केल्याची घोषणा करण्याआधी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील बातमीची दखल घेऊन पञव्यवहार केला होता त्यामुळे आता त्यांच्या मागणीला यश आले आहे.
सर्व कर्जाचे हप्ते तीन महीने स्थगित केल्याने लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर ही मोठी घोषणा करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. कोरोना संकटामुळे आर्थिक मंदी येण्याची शक्यता आहे अनेक क्षेत्रांना कोरोनाचा फटका बसलेला आहे . GDP चे अपेक्षित उद्दिष्ट गाठणे अवघड झाले आहे . येत्या काळात बँकेचे व्याजदर कमी होणार आहेत