आरोग्यमाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील पञकारांची मोफत कोरोना चाचणी; आमदार महेश लांडगे यांचे आवाहन

मुंबईतील ‘त्या’वृत्तानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये सतर्कता; आयुक्त श्रावण हर्डिकर यांना मोफत चाचणीबाबत सूचना


पिंपरी (वास्तव संघर्ष) :महाराष्ट्रात मुंबईनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शहरांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. शहरातील सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाबाबत घडामोडी पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी धडपड करीत असतात. जीव धोक्यात घालून वृत्तांकन करणाऱ्या या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची मोफत कोरोना चाचणी करण्यात येईल, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला संबंधित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची कोरोना चाचणी करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. मुंबईत १६८ पत्रकारांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आहे. यामध्ये राज्यातील पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारांची मोफत कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्यासोबत चर्चा करण्यात आली असून, संबंधित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सचिन फोंडके मो.7720043862 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

Share this: