क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

संचारबंदीत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहराला रविवारी रात्रीपासून कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. 19 ते 27 एप्रिल या कालावधीत शहरात कुणालाही घराबाहेर फिरण्यास मुभा नाही. तसेच शहरातून बाहेर आणि बाहेरून शहरात येण्यासही बंदी आहे. पोलिसांनी यासाठी नाकाबंदी वाढवली असून शहरात देखील विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे.

माञ असे असताना देखील काही महाभाग संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण घराबाहेर फिरताना दिसत आहेत. कुणी मार्निग वाॅकला जातात तर कुणी विनाकारण फिरताना दिसतात अशा 100 जणांवर सांगवी पोलिसांनी आज कारवाई केली आहे. काही जणांवर गुन्हे, काहींना शिक्षा तर काहींना खडेबोल सूनावुन सोडण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी सांगवी परिसरात काहीजण विनाकारण फिरताना आढळून आले. पोलिसांनी या सर्वाना सांगवी पोलीस ठाण्यासमोर आणले. सकाळी-सकाळी सर्वांना भर रस्त्यावर बसवून त्यांना खडेबोल सुनावण्यात आले. सांगवी पोलिसांनी काही जणांना काठीचा प्रसादही दिला. तर काही जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार गुन्हेही दाखल केले.

तसेच पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान, सीआरपीसी, मुंबई पोलीस कायदा, साथरोग कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा अशा विविध कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आला आहे.

Share this: