बातम्यामहाराष्ट्र

मंञी धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयाविरुद्ध मागासवर्गीयांचे आॅनलाईन आंदोलन ;शिष्यवृतीमधली क्रिमिलेअर रद्दची मागणी

दिपक साबळे….!

पिंपरी (वास्तव संघर्ष) महाराष्ट्र राज्य शासन समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकताच अनुसूचित जाती एससी-एसटी प्रवर्गासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृतीमध्ये क्रिमीलेयर ची अट दिली आहे. यामध्ये त्यांनी एससी – एसटीचा विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जात असेल तर त्याला सहालाख उत्पन्न दाखवून क्रिमीलेयर काढणे बंधनकारक केले आहे.

मात्र धनंजय मुंडे यांनी घेतलेला निर्णय एससी एसटी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासंदर्भात अन्यायकारक असून क्रिमिलेअर ची अट रद्द करणेबाबत अनेक एससी एसटी विद्यार्थी आणि संस्था संघटनेने त्यांना इमेल पाठवला आहे.त्यामुळे ही आॅनलाईन आंदोलन असल्याचे आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थी म्हणतात.

मुंडे यांना पाठवलेल्या ईमेल मध्ये म्हटले आहे की, आपले सामाजिक न्याय विभागाचे वतीने दिनांक 5 मे 2020 रोजी शासन निर्णयद्वारे अनुसूचित जाती विद्यार्थ्यांच्या विशेष अध्ययन करण्यास्तव राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती मध्ये बदल करण्यात आले आहेत.सदर शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांसाठी सहा लाख रुपयांची क्रिमिलियरची अट या नव्या सुधारणांमध्ये अनिवार्य केली आहे. ही बाब अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक असून यामुळे अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी सोयी-सवलती देत असताना भारतीय संविधानाने मार्गदर्शक केलेल्या तत्त्वांच्या पूर्णतः विसंगत व विरुद्ध असल्याने सदर दुरुस्ती तातडीने रद्द होणे आवश्यक झालेले आहे.

तरी माननीय महोदय सदर निवेदनाद्वारे आम्ही आपणास आग्रह पूर्वक विनंती करतो की दिनांक 5 मे 2020 रोजी शासन निर्णयाद्वारे राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेमध्ये लागू करण्यात आलेली क्रिमिलियरची अट रद्द करण्यात यावी.

Share this: